जागतिक आर्थिक मंदीचा फटका; ३० हजार घरे विक्रीविना पडून
जागतिक आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला असून नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रात सुमारे तीस हजार नवीन घरे विक्रीविना पडून राहिली असल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर घेणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. नवी मुंबई बिल्डर असोसिएशनने दोन महिन्यांपूर्वी लावलेल्या मालमत्ता प्रदर्शन केंद्रात दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात होती; पण त्यानंतर वीस कोटी रुपयांचीदेखील गुंतवणूक ग्राहकांनी केली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सोने, वाहन आणि घर खरेदीसाठी गुढीपाडव्यासारखा दुसरा मुहूर्त मानला जात नाही. त्यामुळे या दिवशी विकासक मोठय़ा प्रमाणात सवलत, बक्षीस आणि घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अनुभव आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून विकासकांचे हे प्रयत्न वाया जात असल्याचे आढळून आले आहे. आर्थिक मंदी आणि काळ्या पैशावर लागलेला रोख यामुळे बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक रोडावली आहे. त्यामुळे तळोजा, पाचनंद, खारघर, कामोठे, द्रोणागिरी, उलवा या भागात तीस हजारापेक्षा जास्त घरे व गाळे विक्रीविना पडून असल्याचे दिसून येते, तर नवी मुंबईत सरकारने अडीच वाढीव एफएसआय देऊनही एकही प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. त्यामुळे सध्या एखाद दुसरा ग्राहक घर किंवा गाळा घेणार असल्यास तो खूप मोठय़ा प्रमाणात भाव तोडून घेत असल्याचे रुपारेल रियल्टीचे संचालक अश्विन रुपारेल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा