उरण : जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसाच्या वेळी एमआयडीसीच्या उरण येथील रानसई धरणातून भरून वाहणाऱ्या पाण्यामुळे भिंतीचे प्लास्टर निखळले होते. मात्र त्यामुळे धरणाच्या संरक्षण भिंतीला कोणताही धोका नसल्याचा दावा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता
आर. जी. राठोड यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान शाळा, पुणे यांच्या मार्फत रानसई धरणाची घनता तपासणी करून घेण्यात आली असून या परिक्षण अहवालानुसार धरणाची भिंत चांगल्या स्थितीत असून सुरक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबई गोवा महामार्गाच्या गतीने होणाऱ्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाविषयी मनसेकडून साशंकता

हेही वाचा – रस्त्यावर काँक्रीटीकरणासाठी खोदलेल्या खड्डयामुळे जेएनपीटी – करळ मार्गावर कंटेनर वाहनाचा अपघात

रानसई धरण काठोकाठ भरल्यानंतर अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी ओव्हरफ्लो सेक्शन (सांडवा) अस्तित्वात आहे. सांडव्‍यावरून पाण्‍याचा प्रवाह सुरळीत व्‍हावा म्‍हणून सांडव्‍यावरती सुरक्षा लेपन दिलेले आहे. स्पिलवेच्‍या खालील बाजूस स्टीलिंग बेसीनची (Stilling Basin) रचना धरणाच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याची उर्जा नष्ट करण्यासाठी तसेच खालील बाजूस होणारी धूप टाळण्यासाठी केली जाते. पाण्याच्या प्रवाहामुळे स्टीलिंग बेसीनमधील काही ठिकाणचे काँक्रीट निघाले आहे. तसेच धरणाच्या भिंतींच्या सांडव्‍यावरून पाणी वाहून जाण्याच्या भागावरील जुने अतिरिक्त सुरक्षालेपण वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने निघत आहे. तथापि यामुळे धरणाला कसल्याही प्रकारचा धोका उद्भवत नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.