पनवेल: सिडको महामंडळाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत. मागील दोन वर्षांपासून नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतक-यांनी विविध आंदोलने केली आहेत. १ जुलैपासून बेलापूर येथील नैना टॉवरसमोर शेतकरी प्राणांतिक उपोषण करणार आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पापासून २५ किलोमीटर क्षेत्रासाठी नियोजनबद्ध बांधकामातून स्मार्ट शहर उभारणीसाठी नैना प्रकल्पाची घोषणा २०१३ साली केली. या प्रकल्पामध्ये संपादित जमिनीचा ४० टक्के विकसित भूखंड शेतक-यांना दिला जाणार आहे. हा सर्वात चांगला मोबदला असल्याचे सिडको अधिका-यांचा दावा आहे. परंतू नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी शेतक-यांना कोट्यावधी रुपयांचे पॅकेज दिल्याने नैनाबाधित शेतक-यांनी सुद्धा जमीनीच्या संपादनापोटी सिडकोने व राज्य सरकारने चांगले पॅकेज द्यावे किंवा युडीसीपीआर कायद्यानूसार नैना क्षेत्रातील शेतक-यांना नूकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा