राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाखो तरुणांना रोजगार देणारा वेदान्त प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. वेदान्त प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी उरणच्या गणपती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात युवा सेनेने सह्याची मोहीम सुरू केली आहे. निदर्शनाच्या वेळी शिवसैनिकांकडून ‘ईडी सरकार हाय हाय’च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- रुग्णालय व मेडिकलसाठी सवलतीच्या दरात भूखंड द्या; नगरविकास विभागाचे सिडकोला आदेश

सत्तेच्या स्वार्थासाठी शिंदे सरकारने वेदान्त प्रकल्प गुजरातला नेल्याचा आरोप

वेदान्त प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, शिंदे सरकारने हा प्रकल्प आपल्या सत्तेच्या स्वार्थासाठी गुजरातमध्ये नेल्याचा आरोप रायगड जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर यांनी केला आहे. राज्यातील युवक त्यांना माफ करणार नाहीत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केला. निदर्शनाच्या वेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उप जिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,बी. एन. डाकी युवासेना तालुका प्रमुख नितेश पाटील व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by shiv sena in uran over vedanta project dpj