विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी हे धर्मवीर नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. नवी मुंबई भाजपाच्या महिला मोर्चानेही पवार यांचा निषेध केला. भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या कार्यालय येथे हा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी ज्या राजांनी हिंदू धर्मासाठी आपले प्राण दिले त्यांना धर्मवीर म्हणून जग ओळखते आणि त्यांना अजित पवार यांनी ते धर्मवीर नव्हते असा दावा करून विनाकारण वातावरण गढूळ केले असा आरोप यावेळी करण्यात आला.

हेही वाचा- नववर्ष व वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई पालिका मुख्यालयावर रोषणाई; नागरीकांची गर्दी

अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शरद पवार यांनी शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून नये म्हणून विधान केले होते तर अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजांना धर्मवीर म्हणू नये असे विधानसभेत सांगितले. त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना मंत्रालयात फिरू देणार नाही अशा इशारा जिल्हा सचिव व महामंत्री मंगल घरत घरत यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्षा  दुर्गाताई डोख जिल्हा महामंत्री  मंगल घरत व  उज्वला जगताप, उपाध्यक्ष विजयाताई घरत यांच्यासह अनेक जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader