राज्यातील एक तपाहून अधिक काळ रखडलेला एकमेव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्डे व कंत्राटदारांच्या निकृष्ट कामामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गाची दुरुस्ती करून त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या मागणीसाठी ऐन सुट्टीच्या दिवशी रविवारी माझं पेणकर समितीने हा महामार्ग ठप्प केला. या संदर्भात प्रशासनासोबत चार बैठका झाल्या. मात्र, काहीच तोडगा निघाला नाही. प्रशासनाने आंदोलन करू नये म्हणून विनंती केली. मात्र, आंदोलक आंदोलन करण्यावर ठाम आहेत.
हेही वाचा- सोमवारपासून बेलापूर ते जेएनपीटी वॉटर टॅक्सी सेवा सुरु
महाराष्ट्रातील एकमेव असा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून संथगतीने सुरू असून सध्यस्थितीत मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात घडून नाहक बळी जात आहेत. त्यामुळे हा महामार्ग वापरण्यायोग्य नसल्याचे हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. तर महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप ते रामवाडी या बंदिस्त पुलामुळे पेणचे अस्तित्व मिटत असल्याने मुंबई गोवा महामार्गाचे योग्य प्रकारे काम व्हावे याकरिता रविवारी माझं पेण संघर्ष समितीकडून बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा- नवी मुंबईत रिक्षांच्या रांगा, मीटर प्रमाणीकरणासाठी प्रतिक्षा
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी अनेकदा सामाजिक राजकीय संघटनांनी आंदोलने केली मात्र याकडे सरकारासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील हा एकमेव महामार्ग रखडलेल्या अवस्थेत राहीला आहे. बारा वर्षे पूर्ण होत आली तरीही पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा पूर्ण होत नाही.या रस्त्यात आजही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था आहे एकीकडे धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तर खड्ड्यांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण जाऊन अनेकांना अपंगत्व आले आहे.त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महीला,जेष्ठ नागरिक, रुग्ण,गरोदर स्त्रिया या सर्वांना प्रवास करणे नकोसे झाले आहे. त्यामुळे शासन जोपर्यंत या महामार्गाची दुरावस्था दूर करत नाही तोपर्यंत माझं पेण या समितीमार्फत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- नवी मुंबई पोलीस दलात खांदेपालट होण्याची शक्यता
राजकीय नेत्यांच्या विरोधात आक्रोश
नेत्यांची ठेकेदारी,खड्डेमय,धुळयुक्त रस्ते आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांचा निषेध करीत मतदानावर बहिष्कार व नोटा चा वापर करण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे.