नवी मुंबई : उलवा सेक्टर १९ येथे माशीद साठी सिडकोने भूखंड आरक्षित केला आहे. मात्र या ठिकाणी मुस्लिम नगण्य असताना मशीद साठी भूखंड दिल्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.
सकल हिंदू समाजातर्फे नवी मुंबईतील उलवे येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सिडकोने उलवे विभागात मशिदीसाठी भूखंड आरक्षित केल्याने सिडकोच्या लँड जिहाद विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. असा दावा आयोजकांनी केला आहे. तसेच उलवे मध्ये हिंदू समाजाची संख्या जास्त असली असूनही मंदीरासाठी भूखंड दिला नाही. मात्र मुस्लिम समाजासाठी मशिद उभारण्यासाठी भूखंड सिडको देत आहे. हा भूखंड आरक्षित करण्यासाठी भाजपाचे आमदार महेश बालदी यांनी प्रयत्न केला असल्याचा आरोप करत या भूखंडावरील आरक्षण रद्द न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आला. अशी माहिती सकल हिंदू समाज कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी दिली. उलवा सेक्टर १९ पासून उलवा सिडको कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. सुमारे पाच ते सहा हजार लोक यात सामील झाले असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला.
आणखी वाचा- बी.आर.एस. पार्टीचा नवी मुंबईत मेळावा
या मोर्चामुळे काल पासूनच उलवे भागात तणावपूर्ण शांतता होती. काल नेहमीपेक्षा लवकर व्यवयायिकांनी आपआपल्या आस्थापना, इतर छोटे व्यावसायिक हॉटेल्स बंद केली होती तर आज सकाळी तुरळक ठिकाणी उघडण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.