पनवेल : सहा महिन्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमान उड्डाण होणार आहे. तसेच विधानसभेच्या निवडणूका तीन महिन्यांनंतर होणार असल्याने पनवेल व उरणमधील स्थानिक मतदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव मिळावे यासाठीचा लढा पुन्हा आक्रमक करण्याचा विचार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

मागील दोन वर्षांपासून पनवेल व उरण येथील विविध राजकीय पक्ष, स्थानिक प्रकल्पग्रस्त या लढ्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. तरी केंद्र सरकारने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर न केल्याने प्रकल्पग्रस्तांच्या मनात खदखद आहे. या रोषाचा फटका विधानसभेच्या निवडणूकीत पनवेल, उरण व नवी मुंबईतील उमेदवारांना बसू नये यासाठी भाजप व महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. बुधवारी पनवेल येथे दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान, नागरी विमान वाहतूक केंद्रीय व राज्यमंत्र्यांकडे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.  

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

हेही वाचा…फ्लेमिंगोला ड्रोनचा धोका तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गृह विभागाला निर्देश

दि. बा. पाटील यांची २४ जूनला पुण्यतिथी आहे. राज्य सरकारने दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठविला. मात्र दोन वर्षे झाले त्यावर कोणताही निर्णय केंद्र सरकारने दिला नाही. त्यानंतर उलवे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार भव्य सभा झाली. त्या सभेत यावर कोणतेही भाष्य पंतप्रधान मोदी यांनी न केल्याने पनवेल व उरणचे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणूकीसाठी खारघर येथील प्रचारसभेत ७ मेरोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल असा विश्वास व्यक्त करुन पुन्हा स्थानिकांची साथ मिळविण्याचा प्रयत्न केला. यावर्ष अखेरीस या विमानतळाचा पहिला टप्पा मालवाहू विमानांचा सुरू होणार असल्याने अवघ्या सहा महिन्यांमध्ये या विमानतळाच्या नावावर केंद्राला सुद्धा निर्णय घेणे गरजेचे असणार आहे.

हेही वाचा…पनवेल : करंजाडे बसच्या फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी

विमानतळाच्या नामकरणासोबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना या विमानतळामध्ये कोणत्या नोकर्‍या मिळणार याबाबत सिडको महामंडळाने अद्याप कोणतेही स्पष्ट भूमिका मांडली नसल्याने विमानतळाच्या नामकरणासोबत रोजगारासाठी या कृती समितीने पुढाकार घेण्याची मागणी स्थानिक सुशिक्षित भूमिपूत्रांकडून केली जात आहे. दि. बा. पाटील कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडू यांच्यासह राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नामकरणाबाबत भेट घेण्याचे बैठकीत ठरले. या बैठकीत माजी खा. संजीव नाईक, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील, नवी मुंबईचे दशरथ भगत, शेकापचे जे.एम. म्हात्रे,  दि. बा. पाटील यांचे पूत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक नितिन पाटील, जे.डी. तांडेल व इतर उपस्थित होते.