उरण : केंद्रातील मोदी सरकार राबवित असलेली धोरणे ही जनता विरोधी असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. या सरकारला चले जाव चा नारा देत बुधवारी  ऑगस्ट क्रांतीदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व त्यांच्या संघटनांनी उरण शहरातील गांधी चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी मोदी सरकार चले जाव चे फलक झळकावत घोषणा देण्यात आल्या. या निदर्शनापूर्वी चारफाटा उरण ते गांधी चौक असा मोर्चा काढून त्यानंतर निदर्शने करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निदर्शनात केंद्रातील मोदी सरकारच्या महिला, युवक, महागाई, बेरोजगारी, कामगार विरोधी कायदे, शेतकऱ्यांचे निर्माण झालेले प्रश्न याला मोदी सरकार राबवित असलेली धोरणे जबाबदार असल्याची भूमिका मांडण्यात आली. यावेळी जेएनपीटीचे माजी कामगार विश्वस्त भूषण पाटील, जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष अमिता ठाकूर, किसान सभेचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष संजय ठाकूर, सीआयटीयुचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन म्हात्रे यांनी आपली मते मांडली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protests against modi government in uran ysh
Show comments