नवी मुंबई : मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादीअंतर्गत पवार यांच्या या निर्णयाचा विरोध होत आहे. नवी मुंबईतही पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी नवी मुंबई अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले होते.

हेही वाचा – नवी मुंबई शहरात पाणीकपातीमुळे दिवसाला २५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत, मोरबे धरणात फक्त ३७.९४ % जलसाठा

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

यावेळी अध्यक्ष नामदेव भगत यांनी सांगितले की पवार हे राजकारणातील सर्वोच्च नेत्यांपैकी एक असून त्यांचे नेतृत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. मात्र नेतृत्व सोडण्याचा अचानक घेतलेल्या या निर्णयाने आम्हाला धक्का बसला आहे. आम्हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोरकं झाल्याची भावना होत आहे. या भावना व्यक्त करण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिकरित्या राजीनामा मागे घेण्याची मागणी करीत आहोत. असेही भगत यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.    

Story img Loader