आपण नेहमीच सहज बोलण्यातून देशात भ्रष्टाचार किती वाढला या विषयावर हिरहिरीने बोलतो , मात्र प्रत्यक्षात अशी वेळ आली तर किती लोक लाच लुचपत विभागाकडे तक्रार करतात ? झंझट नको म्हणून चिरीमिरी देत आपले काम करून घेतो हेच भ्रष्टाचाराचं कारण आहे. त्यामुळे लाच लुचपत विभागाने पुढाकार घेत नवी मुंबईत जन जागृती मोहीम शुक्रवारी सुरू केली आहे .

हेही वाचा >>>नवी मुंबई: एपीएमसीस ट्रकला आग, सुदैवाने जीवित हानी नाही

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एसीबी नवी मुंबई विभागाकडून नवी मुंबई परिसरात कार्यक्रम राबविण्यात आले. यात नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे एम.एस. ई.डी.सी. एल. कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, वॉर्ड कार्यालय, सिडको ऑफिस कोपरखैरणे इत्यादी शासकिय कार्यालयाचे दर्शनीय ठिकाणी भित्तीपत्रके लावून कार्यालयात आलेल्या लोकांना माहिती पत्रके वाटून भ्रष्टाचाराचे विरुद्ध निर्भयपणे तक्रार देण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच तळोजा परिसरात तळोजा कारागृह, सिडको कार्यालय खारघर, एमएसइडीसीएल कार्यालय, खारघर, अग्निशमन दल खारघर इत्यादी शासकीय कार्यालयाचे ठिकाणी भित्तीपत्रके लावून कार्यालयात आलेल्या लोकांना माहिती पत्रके वाटण्यात आली.कोपरखैरणे एनएमएमटी बस स्थानक येथील प्रवाशांना माहिती पत्रके वाटून भ्रष्टाचाराचे विरोधात निर्भयपणे तक्रार देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.येत्या आठवडाभर असेच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात लोकांची जास्तीत जास्त संपर्क करण्यावर भर देण्यात येणार आहे. अशी माहिती लाच लुचपत विभागाने दिली.

Story img Loader