नवी मुंबईचाच विकासाचा एक भाग असलेल्या उरण तालुक्यातील गावा गावात असलेल्या सार्वजनिक गाव तलावांची ग्रामस्थांचे राखीव जलस्रोत म्हणून ओळख होती मात्र सध्या गावोगावच्या तलावातील वाढत्या कचऱ्यामुळे तलाव की कचराकुंड्या असा प्रश्न निर्माण करणारी या तलावांची स्थिती झाली आहे.
हेही वाचा >>>बनावट परवानग्यांद्वारे ‘रेरा’ प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल डोंबिवलीतील ३८ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल
उरण तालुक्यातील १८ गावातील जमिनी सिडकोने नवी मुंबईसाठी संपादीत केली आहे. त्यानंतर येथील उद्योगात ही भर पडली आहे. त्यामुळे उरणच्या नागरीकरणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे येथील गावाचे निमशहरी करणं झालं आहे. याचा परिणाम म्हणजे ही गावे ना धड पूर्ण शहरे झाली ना गावे राहिली या अर्धवट विकासामुळे गावांसाठी ग्रामस्थांनी एकजुटीने निर्माण केलेल्या अनेक सोयी या गैर लागू होऊ लागल्या आहेत. यामध्ये प्रत्येक गावात पूर्वजांनी पिण्याच्या व इतर कामांसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था म्हणून सार्वजनिक तलावांची अथक प्रयत्न व मेहनतीने तलावांची उभारणी केली होती. त्यामुळे येथील अनेक ग्रामपंचायतीच्या मालकीची गावो गावी सर्वजनिक तलाव आहेत. या तलावांची राखणं करण्याची तरतूद होती. मात्र मागील ५० वर्षात सिडको आल्यानंतर अनेक तलावाकडे दुर्लक्षित होऊ लागले आहेत.त्यानंतर यातील सार्वजनिक तलावाचा वापर मासेमारीसाठी केला जाऊ लागला होता. त्यांचे लिलाव करून तलावांची सुरक्षा केली जात होती. मात्र गावातील सार्वजनिक तलावांवरील ताबा सुटल्याने अनेक गावातील तलावात मोठया प्रमाणात घाण,कचरा टाकला जात आहे. त्यातच गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात मूर्तीचे विसर्जन केले जात असतांना तलावात टाकण्यात येणारे निर्माल्यमुळेही तलावातील कचऱ्यात वाढ झाली आहे.
हेही वाचा >>>कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी अस्मिता जाधव
जलप्रदूषण ही वाढले गावातील सर्वजनिक तलावात
टाकण्यात येणाऱ्या कचरा व घाणीच्या आणि साबणाच्या पाण्यामुळे या तलावातील जलप्रदूषणातही वाढ होऊ लागली आहे. या प्रदूषणामुळे तलावातील मासळी व सजीवांवर परिणाम होऊ लागला आहे.