पनवेल : पनवेल तालुक्यामधील कोन सावळा रस्त्यावर २० अवैध फलकांचे पाडकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून हाती घेतले आहे. तालुक्यातील कोन सावळा मार्गावरील फलक पाडण्यासाठी शुक्रवार ते पुढील आठवड्यापर्यंत जोरदार मोहीम राबविली जाणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांवर खासगी जमिनी आणि सरकारी जमीनींवर अवैध फलक उभारले गेले आहेत. मागील अनेक वर्षे सरकारी जमीनींवर फलक उभारुन त्याचे भाडे घेणारी टोळी पनवेलमध्ये सक्रीय आहे. कोन सावळा रस्त्यालगत २० फलक काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मिलिंद कदम यांनी २ क्रेन यंत्र आणि १० मजूर घेऊन पाडकाम सुरू केले.

हेही वाचा…पनवेलच्या ‘इंटरनेट’ लेडीजबारवर पोलिसांची धाड

घाटकोपर येथील फलकाच्या दुर्घटनेत अनेकांचा बळी गेल्यावर का होईना मात्र सरकारी यंत्रणा पनवेलमध्ये अवैध फलकांविरोधात जोरदार मोहीम राबवित आहे. कोन सावळा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असल्याने सरकारी जमिनींवर हे अवैध फलक उभारल्याने अनेक वर्षांपासूनचे अवैध फलकांच्या माध्यमातून व्यवसायातून उत्पन्न कमविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.