नवी मुंबई : अवकाळी पाऊस आणि कडक उन्हाने डाळींच्या उत्पादनाला फटका बसला आहे त्यामुळे बाजारात डाळींची आवाक कमी होत असून दरात वाढ होत आहे. या आठवड्यात चणाडाळ तूरडाळ आणि मूग डाळीचे दर दोन ते तीन टक्क्यांनी वाढले आहेत. पुढील कालावधीत ही डाळींचे दर चढेच राहतील असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत यंदा अवकाळी पाऊस आणि उष्ण वातावरणाने कडधान्य उत्पादनात घट झाली असून आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली असल्याचे मत घाऊक व्यापरी करीत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घाऊक बाजारात तूरडाळ,मुगडाळ, चणाडाळ,  यांच्या दरात २% ते ३%वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात, परंतु राज्यातून आणि गुजरात मधून मोठ्या प्रमाणावर डाळींची आवक होते.  मात्र पावसामुळे उत्पादनाला फटका बसला असून बाजारात डाळींची आवक कमी होत आहे.  मंगळवारी घाऊक बाजारात  ६५६ क्विंटल चणाडाळ आवक असून आधी प्रतिकिलो ५७ रुपयांनी उपलब्ध होती तू आता ६१ रुपयांवर गेली आहे. मुगडाळ १५४९ क्विंटल तर तूरडाळ १६४८क्विंटल दाखल झाली असून आधी प्रतिकिलो ९४ रुपये होती आता शंभरी गाठली आहे.