पनवेल : सलग सुट्यांनंतर मुंबईत परतणाऱ्या वाहनांची संख्या रविवारी दुपारी वाढण्यास सुरुवात झाली. रात्री सात वाजेपर्यंत पनवेल शीव महामार्गावर कळंबोली सर्कल ते खारघर टोलनाका या परिसरात वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी पोलीस बंदोबस्त लावला होता. तरी वाहतूक संथगतीने सुरु होती.
हेही वाचा – उरणचं पेन्शनर्स पार्क उरलं केवळ फलका पुरते, अतिक्रमणामुळे पाय ठेवायलाही जागा नाही
हेही वाचा – उरणच्या पश्चिम विभागातील सर्व जमिनी संपादनासाठी सिडकोची पुन्हा नवीन अधिसूचना
कळंबोली सर्कल ते कोपरा पुलापर्यंत या एक ते दोन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्धा तास लागल्याने प्रवासी वैतागले होते. सलग सुट्यांनंतर मुंबईत परतणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे ध्यानात आल्याने नवी मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी कळंबोली ते बेलापूर या दरम्यान तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पाच पोलीस निरीक्षक आणि दिडशेहून अधिक वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियमनासाठी तैनात केले होते. पनवेल महापालिकेने रक्षक पोलिसांच्या मदतीसाठी दिले आहेत. तरी हजारो वाहनांमुळे वाहतूक नियमनाचे गणित कोलमडले होते.