शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून घटस्थापनेने सुरुवात झाली. उरणच्या जेएनपीटी कामगार वसाहतीत ही रास दांडियाचा आवाज घुमणार आहे. ऐश्वर्या कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली वाढली; या वर्षाअखेरीस ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य
नवरात्रोत्सवानिमित्त रास दांडियाचे आयोजन
दोन वर्षांनंतर यावर्षी निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात प्रामुख्याने दांडिया खेळण्यासाठी तरुणाई उत्साही असते. ही संधी दोन वर्षानंतर पुन्हा आली आहे. त्यामुळे तरुणांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. उरण मध्ये उरण शहर तसेच गावा गावातून ही सार्वजनिक व खाजगी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे तालुक्यात अनेक सार्वजनिक मंडळ आहेत. या मंडळाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे गावातील देवींच्या देवळातूनही जागर केला जातो. कुटुंबात घटस्थापना करून हा उत्सव साजरा केला जात आहे.
हेही वाचा- नवी मुंबईत एकाच वेळी सिग्नलचे तिन्ही दिवे सुरु असल्याने वाहनचालक पडले गोंधळात
उत्सव काळात पोलीस बंदोबस्त वाढवणार
शहरात पुढील नऊ दिवस सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम असणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जेएनपीटी कामगार वसाहतीत जागरणानिमित्त रास दांडियाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ऐश्वर्या कला, क्रीडा मंडळाचे संयोजक सुधीर घरत यांनी दिली आहे. या उत्सवादरम्यान पोलीस बंदोबस्त ही वाढविण्यात आला आहे.