वाशीतील कृष्णा बारवर पोलिसांनी कारवाई केली. बारमध्ये महिला वेटर ग्राहकांना सेवा देताना अश्लील हावभाव करीत असल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. या वेळी एका ग्राहकासह सात महिला वेटर आणि बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी गावात कृष्णा बार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिला वेटरकरवी समोरच्या व्यक्तीला संकोच वाटेल अशा पद्धतीचे हावभाव करवून घेण्यात येत होते. याविषयीची माहिती वाशी पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी रात्री बारवर छापा टाकण्यात आला. काही दिवसांपासून बारमध्ये नियमांचे उल्लंघन केले जात होते, तसेच काही गैरप्रकार सुरू होते, असे पोलिसांनी सांगितले.