उरण : तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. चिरनेरमध्ये कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बर्डफ्ल्यू आढळल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ९ फेब्रुवारी पर्यत कोंबड्यांची खरेदी विक्री, बाजार यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे इतर कोंबड्यांना देखील त्याची बाधा होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी चिरनेर येथील शेतकरी कुक्कुटपालकांना बाधित क्षेत्रातील मृत आजारी निरोगी दिसणारे पाळीव पक्षी त्याचप्रमाणे गिनी टर्की बदकाचे मांस, विष्ठा, अंडी महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे बाधित ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. खासगी वाहने देखील बाधित ठिकाणाच्या बाहेर पाचशे मीटर अंतरावर लावण्यात यावी अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे बाधित क्षेत्रात जिवंत व कुक्कुट पक्षी, अंडी, पशुखाद्य,विष्ठा अशा प्रकारच्या साहित्याच्या वाहतुकीस ९ फेब्रुवारी पर्यत बंदी घालण्यात आली आहे. ९ फेब्रुवारी पर्यत कोंबड्यांची खरेदी विक्री, बाजार यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. चिरनेर मधील महेंद्र मोकल यांच्या पोल्ट्रीतील ३०५ कोंबड्या मारून नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील कुक्कुटपालन करणाऱ्यांच्या कोंबड्या मारून नष्ट करण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : ‘कोल्ड प्ले’ने वाहतूक ‘थंडावली’

दहा किमी परिसर बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित

चिरनेर येथे परिसरातील कुकुट पक्षांमध्ये मरतुक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळा, भोपाळ मध्य प्रदेश येथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेने कुकुट पक्षातील मरतुक एव्हियन इन्फ्लुएंझा/ बर्ड् फ्लू या रोगासाठी अहवाल होकारार्थी आल्याचे कळवले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad district collector ordered to kill birds to prevent bird flu in chirner in taluka action started from sunday sud 02