लोकसत्ता प्रतिनिधी

उरण : वाढते औद्योगिक क्षेत्र व आयटी उद्योग यामुळे मुंबईनंतर रायगड हे देशाचे आर्थिक इंजिन होणार असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उरणच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. उरणच्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृश प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच उरण नगर परिषदेच्या प्रशासकीय भवन, सावित्रीबाई फुले फुल बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन व समाज विकास केंद्र या वास्तूंचे लोकार्पण तसेच सिडकोच्या वतीने चारफाटा येथे उभारण्यात आलेल्या मासळी बाजाराचेही लोकार्पण, दस्तान ते चिरनेर मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे यावेळी सुरुवात करण्यात आली.

Permission , robotic parking lot, Mumbadevi,
मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Chief Minister Devendra Fadnavis order regarding Vadhuvan Port
‘वाढवण’साठी ठोस पावले; ३१ मार्चपर्यंत जमीन अधिग्रहण, परवानग्या पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
Agriculture Commissioner, traders ,
शेतीमाल हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, कृषी आयुक्तांचे आदेश
Akola Municipal Corporation privatization tax collection
करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…
Ramdas Athawale Devendra Fadnavis Mayor post pune corporation
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा

यावेळी ते पुढे म्हणाले की रायगड हा सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे. रायगड मधील उद्योगात वाढणार, आयटीत रायगड आणि नवी मुंबईत डेटा सेंटरच्या माध्यमातून नवीन सोन्याची खाण असणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध होणार आहेत. तर नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीमध्ये उत्पन्नात एक टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे आधुनिक भारतात आधुनिक उरणची निर्मिती होत आहे.

आणखी वाचा-Overhead Wire : मानखुर्द ते वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, लोकल सेवा विस्कळीत, ट्रान्सहार्बरने प्रवास करण्याची मुभा

यावेळी विरोधकांवर टीका करतांना त्यांनी आमच्या सरकारचे एक हजार प्रकल्प दाखविता येतील मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांनी उभारलेला एक प्रकल्प दाखवावा अशी टीका करीत त्यांच्यां सरकारच्या काळात त्यांनी सर्व प्रकल्प थांबविण्याचे काम केले आहे. तर वाढवण बंदरामुळे विकासात वाढ होणार आहे. जेएनपीटीचा विस्तार होणार नाही. त्यामुळे वाढवण उभारले जात आहे. या बंदराचा जगातील दहा मध्ये क्रमांक लागणार आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे. विरोधकांकडून विरार अलिबाग कॉरिडॉरच्या विकासात ही खोडा घातला जात आहे. मात्र आमदार महेश बालदी यांनी उरणचा विकास केला आहे.

त्यांनी नगर परिषदेला उत्पन्न देणारे प्रशासकीय भवन,सिडकोने उत्कृष्ट व सुसज्ज मासळी बाजार उभारला आहे. घारापुरी बेटावर वीज पुरविण्याच काम आमच्या कारकिर्दीत झालं आहे. करंजा मच्छिमार बंदर १२० कोटींचा बंदर ३०० कोटींवर गेलं. १५३ कोटीचा निधी मिळणार करंजा हे आशिया खंडातील फिशिंग हार्बर मत्स्य बंदर उभे राहणार मोदींनी मासेमारी करणाऱ्यासाठी काम केले. आता काम थांबणार नाही. उरणच्या विकासासाठी आ. महेश बालदी यांचा पाठपुरावा आहे. नगर परिषद क वर्गाची असली तरी इमारत मात्र अ वर्गाची उभारली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार महेश बालदी हे कोकणातील मच्छिमारांचे प्रश्न मांडीत आहेत. त्यांचे प्रश्न सोडावीत असल्याचे तसेच विकास करणाऱ्या आमच्या सरकारवर विरोधक टीका करीत असल्याचे मत रायगडचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा-“भिरा प्रकल्पाचे पाणी आणा”, मोरबे धरणाच्या जलपूजनानंतर नाईक यांचे वाढीव पाणी नियोजनाचे सूतोवाच

राज्यात काम करणारे सरकार असल्याचे सांगून विरोधक टीका करीत आहेत,बालदी उरणकरांच्या मनातील आमदार आहेत. असे मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. क स्तर नगरपरिषद असतांनाही प्रशासन भवन उभारण्यात आले असून माझी राजकीय सुरुवात ही याच नगरपरिषदेतून नगरपालिका दरवर्षी पाच कोटींच उत्पन्न मिळणार असल्याचे मत महेश बालदी यांनी व्यक्त करीत विरोधकांवर टीका केली. तर उरणच्या करंजा बंदर व बाह्यवळण मार्गासाठी निधी देण्याची त्याच प्रमाणे उरणच्या रेल्वे स्थानकात दुचाकी वाहनांना मोफत वाहनतळ उपलब्ध करून देण्याचीही मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

नगर परिषदेच्या प्रशासकीय भावनातून वाणिज्य गळ्यातून वर्षाकाठी ५० लाख रुपये भाडे मिळणार आहे. फुल बाजार इमारती मधून ही वार्षिक २५ लाख रुपयांचे भाडे मिळणार आहे. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार रवींद्र पाटील,प्रशांत ठाकूर तसेच उरण नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाचे अधिकारी ही उपस्थित होते.

Story img Loader