पनवेल : रायगड जिल्ह्यातील खोपोली व पनवेल येथे शिक्षण घेतलेल्या ऋचा कृष्णकांत दरेकर हिची भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट ‘ या पदावर निवड झाली असून प्रशिक्षण पुर्ण केल्यावर ती आता सेवेत लवकरच रुजू होत आहे. मुळची पळस दरी येथील रहिवाशी असलेली ऋचाचे आठवी पर्यंतचे शिक्षण खोपोली येथे शिशु मंदिरात झाले तर आठवी ते बारावी शिक्षण तिने पनवेल येथील बार्न्स हायस्कूल मध्ये घेतले होते. ऋचा हीने जिल्हा व राज्यस्तरीय तलवार बाजी खेळामध्ये सुवर्ण पदके मिळवली असून ती राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. तिने रसायनी येथील पिल्लई कॉलेज मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग मधून पदवी प्राप्त केली.
हेही वाचा… नवी मुंबईत दोन मुलांचा खून, जन्मदात्या आईनंच चिरला गळा
हेही वाचा… नवी मुंबई: मोकाट श्वानाने केली कमाल, व्यापाऱ्याचे हजारो रुपये लुटणाऱ्या भामट्याला…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीडीएस परीक्षेत लेखी परीक्षेत ऋचा उत्तीर्ण झाली, त्यानंतर पुढे एसएसबी-मुलाखतीची फेरीचा टप्पा तिने यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यामुळे तिला चेन्नई येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी म्हणजे (ओटा) येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. नुकतेच तिने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून चेन्नई येथे झालेल्या पासिंग आऊट परेड झाली आहे. ऋचा ही भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट’ म्हणून नियुक्ती झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.