नवी मुंबई : विधानसभा पूर्वी प्रचार सभेत भर पावसात शरद पवार यांनी केलेल्या भाषणाची चर्चा आजही होते. आज नेरुळ येथेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला मेळावा असून प्रमुख मार्गदर्शक शरद पवार उपस्थित राहणार आहेत मात्र सभास्थानी पाऊस आणि जोराचा वारा वाहत असल्याने येथेही साताऱ्याची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सभास्थळी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांच्या बंडा नंतर नवी मुंबईत पहिलाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य महिला मेळावा आयोजित केला आहे. सहा वाजताच्या मेळाव्याला सात पर्यंत एकही प्रमुख पाहुणा उपस्थित झाला नाही. त्यात संध्याकाळ पासून पाऊस आणि वारा वाहत असल्याने स्थानिक कार्यकर्ते हिरमुसले. मात्र पाऊस जोरदार पडला तरी पवार साहेब येणार आणि पावसात भाषण ठोकणार असा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. सताऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत जोरदार पाऊस आला तरीही भर पावसात पवार यांनी जोरदार भाषण केले ही आठवण आज ताजी झाल्याची चर्चा होत आहे.

आणखी वाचा-ठाणे : शरद पवार यांचा राबोडीत फेरा

मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक बचत गट सामील झाले असून त्यात आयोजकांनी त्यांच्या उत्पादनांना स्टोल्स उपलब्ध करून दिली . मात्र पाऊस आणि वाऱ्याने त्यांचीही त्रेधा तिरपीट उडाली. त्यामुळे त्यांनीही सभेपूर्वी सामानाची बांधाबांध करून घरचा रस्ता पकडला. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain and strong wind at ncp melawa in navi mumbai mrj
Show comments