उरण: शनिवार पासून उरण शहर आणि तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून ऑगस्ट मध्ये गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या उकड्यापासून नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
संपूर्ण ऑगस्ट कोरडा गेल्याने शेतकरी आणि नागरिक चिंताग्रस्त झाले होते. पावसात खंड पडल्याने शेतीला धोका निर्माण झाला आहे. उरण मधील पन्नास टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावरील भात पिके नष्ट झाली आहेत. परिणामी शेती उत्पादनात घट होणार आहे. तर उर्वरित पिके टिकविण्यासाठी आता पावसाची नितांत गरज आहे. तर दुसरीकडे पाणी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची ही समस्या गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा… गणेशोत्सव काळात जादा भाडे आकारणी करणाऱ्यांवर आरटीओची करडी नजर
यातच सप्टेंबरच्या सुरवातीलाच पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र पावसाला जोर नसल्याने पुन्हा एकदा चिंता वाढण्याची शक्यता आहे.