नवी मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला मात्र नवी मुंबईत पाऊस पडला नव्हता . आज अचानक सकाळपासून वातावरणात सकाळी गारवा तर दुपारी असह्य उकाडा जनावर होता. रात्री नऊच्या सुमारास कोपरखैरणे ऐरोली घणसोली महाले भगत पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत गारवा जाणवणे सुरू झाले.
हेही वाचा >>> ठाण्यासह नवी मुंबईत अचानक जोरदार पावसाला सुरुवात, नागरिकांची उडाली धांदल
आज सकाळी संगलीतील पलूस तासगाव तर मराठवाड्यात काल धाराशिव तुळजापूर , बार्शी भागात। बऱ्यापैकी पाऊस झाला. काल पासून नवी मुंबईतही सकाळी आणि रात्री हवेत गारवा तर दुपारी कमालीचा उकाडा जाणवत होता. या परिसरात ही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र पाऊस काही पडला नव्हता. आज (गुरुवारी) सकाळपासून हवेत गारवा जाणवत होता तर सूर्यही झाकोळला गेला होता.दुपारी मात्र अचानक कमालीचा उकाडा जाणवत होता तर संध्याकाळी मात्र हवेत गारवा जाणवू लागला. शेवटी एकदाच पाऊस रात्री नऊच्या सुमारास सुरू झाला. हा पाऊस नवी मुंबईच्या ऐरोली, घणसोली महापेटसेच कोपरखैरणे भागत दोन ते १५ मिनिटे पडला. वाशी ते सीबीडी पर्यंत मात्र पाऊस पडला नसेल तरी सर्वत्र जोरदार वारा आणि विजांचा कडकडाट मात्र झाला. या पावसाने हवेतील गारवा मात्र शहरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात जाणवत होता.