गुरुवारी पहाटे पासून उरण शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली असून गुरुवारी वादळीवाऱ्यासह होणाऱ्या पावसाचा जोर वाढल्याने उरण मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.उरण मध्ये मागील आठवडा भरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी पाच ते दहा मिनिटे कोसळणाऱ्या पावसाच्या प्रमाणात बुधवार पासून वाढ झाली आहे. तर गुरुवारी पहाटे पासून सुरू झालेल्या या पावसाची संततधार व अधून मधून जोराचा असा पाऊस सुरू आहे. त्यामुळे उरणच्या बाजारात खरेदीसाठी तसेच मुलांना शाळेतून ने -आण करण्यासाठी जाणाऱ्याना या पावसाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मध्येच उन्ह पडत असल्याने पावसा पासून बचाव करण्यासाठी छत्री किंवा रेनकोट न घेताच गेल्याने भिजत परतावे लागत आहे.
हेही वाचा >>> तब्बल २८.५ फूट उंच फ्लेमिंगो शिल्पाकृती बेस्ट ऑफ इंडिया राष्ट्रीय विक्रमाची ठरली मानकरी…कुठे पहायला मिळेल?
खड्ड्याच्या प्रमाणात वाढ : उरण मध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक मार्गावर असलेल्या खड्ड्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे.
थंड पाऊस : सध्या सुरू असलेला पाऊस हा थंड असल्याने पावसात भिजल्यास थंडी भरण्याची शक्यता वाढली आहे.