शुक्रवारी अनंत चतुर्थीच्या विसर्जनाला सुरुवात झाली असतांना उरण मध्ये दुपारी चार वाजता पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे विसर्जनाला आलेल्या गणेशभक्तांना पावसापासून बचावासाठी आडोसा शोधावा लागत आहे.
हेही वाचा >>> शहरात मुसळधारा मोरबे क्षेत्रात मात्र रिमझिम; मोरबे धरणात ८५% पाणीसाठा
उरण शहरातील नगरपरिषदेच्या विमला तलावात दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गणेशमूर्ती तलावावर घेऊन येत असतांना कडक ऊन्ह पडलं होतं मात्र अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून सायंकाळी येत असल्याने विसर्जनाच्या वेळी पावसाने सुरुवात केल्याने विसर्जनात अडथळा येऊ लागला आहे. मात्र उरण मधील विसर्जन सायंकाळी 6 वाजल्या नंतरच सुरू होत असल्याने पाऊस कमी होण्याची अपेक्षा आहे.