नवी मुंबई– नवी मुंबई- भारताने चंद्रावरील अद्यावत माहिती घेण्यासाठी सोडलेले चंद्रयान याची देशभरातील नागरिकांना मोठी उत्सुकता आहे. चंद्र यांची मोहीम यशस्वी होत असताना हे चंद्रयान महाराष्ट्रात सोडले असते तर बर झाले असते रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा खर्च वाचला असता अशी उपहार उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेकडून आंदोलनाची हाक; राज ठाकरे म्हणाले, “असं आंदोलन उभारा की…”
राज्यभरात रस्त्यांची दुरवस्था व त्यातच सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई व महामार्गावरील निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकारवर ही टीका केली आहे, आता तुम्ही रस्ता दुरुस्त कराल, पण मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांचे काय. यावर्षी गणपतीत कोकणातील चाकरमान्यांनी जायचं कसं, कोकणात जाण्यासाठी यू टर्न घ्यावा लागतो, हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे.
हेही वाचा >>> “जे खोके खोके ओरडत होते त्यांच्याकडे कंटनेर्स, त्यांनी तर करोना…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबईवरून निघाल्यानंतर पनवेल पळस्पे मार्गे कोकणाकडे जाणारा रस्ता त्याची मात्र सतरा वर्षापासून वाट लागलेली आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याना मुंबईवरून पुणे सातारा त्यानंतर यू टर्न घेऊन पुन्हा कोकणाकडे जावे लागते . परंतु सरकारला त्याचे काही देणे घेणे नाही. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मी भाजपा समवेत गेलो असल्याच्या गप्पा अजितदादा मारत आहेत हे दुर्दैव आहे मी शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेलंच नाही त्या गाडीत मी नव्हतोच अशी उत्तरे दिली जातात त्यामुळे सध्या महाराष्ट्रात निर्लज्जपणाचे राजकारण सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी आजच्या निर्धारित मेळाव्यात केली.