महाराष्ट्रात मनसे वगळता कोणत्याच राजकीय पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेचे काही पडलेलं नाही. काही दिवसापूर्वीच समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला पण याच महामार्गावर आत्तापर्यंत साडेतीनशे नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत याला जबाबदार कोण? महामार्ग सुरू करताना लगेच टोलही सुरू केला. महाराष्ट्रातल्या जनतेची अवस्था म्हणजे टोल भरा आणि मरा अशी झाली असल्याची टीका राज ठाकरे यांनी पनवेल येथील निर्धार मेळाव्यात व्यक्त केली. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावर दोन्ही बाजूला कोठेही फेन्सिंगचे काम केलं नाही त्यामुळे या महामार्गावर रस्त्यांमधून अनेक प्राणी जातात.
हेही वाचा >>> माझ्या मुलाचा जीव परत मिळेल का?
वेगवान रस्ता बनवताना याची अक्कल सरकारला व तिथल्या अभियंतांना आली नाही का त्यामुळे यांना कशाचे काही पडलेले नाही लोकांनी फक्त पैसे भरायचे आणि मरायचे हीच अवस्था महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे . गडकरी आणि फडणवीस दोघेही नागपूरचे म्हणून समृद्धी मार्ग तात्काळ पूर्ण झाला का? दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग गेली सतरा वर्ष रखडलेला आहे याला जबाबदार कोण. याबाबत गडकरी यांनी फडणवीस या दोघांनाही विचारणा केली तर या रस्त्याबाबत कोणी कोर्टात गेले आहे हा रस्ता वादात सापडलेला आहे लवकर याचे काम पूर्ण करू तुम्ही फडणवीस यांच्याशी बोला असे गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गासाठी मंत्र्यांचा पाहणी दौरा तर मनसेचा निर्धार मेळावा
मी ऐकलं की गडकरी हवेत उडणाऱ्या बस गाड्या आणणार आहेत अरे आणा लवकर कधी आणताय महाराष्ट्रातल्या रस्त्याची वाट लागली आहे त्याचे काही पडलेले नाही. महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनासाठी माझा हिरवा कंदील आहे असे आंदोलन करा की आतापर्यंत कोणीच असे आंदोलन केले नाही आणि हे आंदोलन कायम महाराष्ट्राच्या लक्षात राहील व यापुढे राजकारणीही अर्धवट रस्ता करण्याची हिंमत होणार नाही असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना ठाकरे यांनी केले. त्यामुळे लवकरच ठाकरे यांच्या आव्हान नंतर मनसैनिक मुंबई गोवा मार्गासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
रस्ता निर्मिती हा एक धंदा… राज ठाकरे..
नवी मुंबई- महाराष्ट्रात रस्ते निर्मिती हा एक मोठा धंदा आहे. गेली सतरा वर्ष रखडलेला हा मुंबई गोवा महामार्ग हा रस्ता यावर आतापर्यंत २५०० लोकांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण? रस्ते निर्मिती हा एक मोठा धंदा झालेला असून रस्ता बनवला की तो सहा महिन्यात खराब झालाच पाहिजे कारण पुन्हा रस्ते दुरुस्तीसाठी नवीन टेंडर नवीन काम नवीन टक्के हे चक्र सदैव सुरूच राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला काही नागरिकांचं त्यांच्या जीवाचं पडलं नाही. मुंबई गोवा महामार्गाच्या आत्ता असलेल्या अवस्थे च्या अगोदरचा रस्ताच बरा होता किमान आम्ही नीट तरी गावी जात जाऊ शकलो होतो अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे अडीच हजार लोक मृत्युमुखी पडल्यानंतरही कोणालाही त्याचं काही सोयरसुतक नाही. नितीन गडकरी यांनी २०२४ पर्यंत हा रस्ता पूर्ण होण्याचे मला सांगितले आहे परंतु रस्ता तयार झाला की पुन्हा खड्डे निविदा टक्केवारी हे चक्र सतत सुरूच राहणार असल्याची टीका राज ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात केले आहे.
खोके खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर आहेत
नवी मुंबई- मुंबई गोवा महामार्ग विषयी कोणालाच काही पडलेलं नाही. आता काही जणांनी ओरडायला सुरुवात केलेली आहे. अरे पण हो आता आलेल्या सत्ताधाऱ्यांच्या अगोदर तुम्हीच महाविकास आघाडी म्हणून सत्तेत होतात ना तेव्हा तुम्ही काय केलं या महामार्गासाठी. आता खोके खोके म्हणून ओरडतात पण यांच्याकडेच कंटेनर आहेत कंटेनर यांनी करोनालाही सोडलं नाही अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या सेनेवर केली आहे. मुंबई महापालिकेतील करुणा काळातील भ्रष्टाचाराचे प्रकरण व अधिकाऱ्यांची चौकशी ईडी मार्फत सुरू असल्याने राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गटावर या मिळाव्यात जोरदार टीका केली आहे.