४५ वर्षांची परंपरा जपत पनवेलच्या कलाकारांनी एकत्र येत यंदाही दिवाळीत पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलच्या प्रांगणात रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगदीप क्रिएशनने यंदा पनवेलकरांसाठी २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत या रांगोळ्या पनवेलकरांना पाहता येणार आहे. पनवेलमधील विविध १९ कलाकारांनी सहभाग घेऊन हे या रांगोळ्या काढल्या आहेत. या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन शेकापचे नेते व पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले.
हेही वाचा- नवी मुंबई: मोरा बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त
४५ वर्षापूर्वी रांगोळीतून दिवाळीचे रंग पनवेलकरांच्या मनामनापर्यंत पोहचविण्याचे काम चित्रकलेचे शिक्षक नंदकुमार गोगटे व एन. के. अनावकर गुरुजींनी सूरु केली. ही प्रथा सध्या पनवेलची चित्रकलेतील तिसरी पिढीने सूरु ठेवली आहे. पनवेलसह पेण येथील चित्रकारही यामध्ये जोडले गेले आहेत. यंदाचे खास आकर्षण पाण्याखालची निसर्गछटा दर्शविणारी रांगोळी आणि थ्रीडी परिणाम दर्शविणारी मोराची रांगोळी हे आहे. तसेच विविध २३ रांगोळ्यांमध्ये अमिताभ बच्चन, लता मंगेशकर छत्रपती शिवाजी महाराज, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम अशांसोबत आझादीचा अमृत महोत्सवात सध्याचा भारत देशाची शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, गरिबी, बालकामगार यांची छटा कलावंतांनी विविध रंगांमधून दाखविली आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : दिवाळी संपताच बेकायदा फलकबाजीवर कारवाईचा चाबूक
तसेच आझादीच्या अमृत महोत्सवाचे स्मरण करताना ज्या महात्मांमुळे हे स्वतंत्र मिळाले त्या महात्मांची छटा येथे पाहायला मिळणार आहे. जेष्ठ कलाकारांसोबत काही बालकांनी रेखाटलेली चित्रे प्रदर्षणात मांडण्यात आली आहेत. कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पनवेलकरांनी आवर्जून या रांगोळी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन शेकापचे नेते म्हात्रे यांनी केले आहे. रंगदीप क्रीएशनचे अध्यक्ष प्रकाश नवाळे, उपाध्यक्ष मनोज भोपी यांच्यासह गोगटे सर हे रंगदीपच्या कलाकारांना आजही मुख्य मार्गदर्शन करतात. सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी पाच ते साडेनऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले आहेत.