मागील काही महिन्यांपासुन कांदा पाठोपाठ बटाट्याचे दर देखील वरचढ ठरत आहेत. बाजारात आता नवीन बटाटा देखील दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.मात्र यंदा सुरुवातिला पाऊस लांबल्याने नवीन बटाटा बाजारात दाखल होण्यास विलंब झाला आहे. परंतु आता बाजारात नवीन बटाटा आवक वाढली असून जुना बटाटा हंगाम कमी होत आहे. येत्या १० ते १५ दिवसांत जुन्या बटाट्याचा हंगाम संपुष्टात येणार आहे. परंतु सध्या बाजारात जुन्या बटाट्याचा हंगामी संपत आलेला असतानाही , नवीन बटाट्यापेक्षा जुने बटाट्याचे दर अधिक भाव खात आहेत. एपीएमसीत नवीन बटाटा प्रतिकिलो ८ ते १२ रुपये तर जुना बटाटा १८ ते २१ रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा- मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईतून १४२ गाड्यांचा ताफा रवाना

Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी

एपीएमसी बाजारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात बटाटा येत असतो. बाजारात आता नवीन बटाटा मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. एपीएमसीत गुरुवारी ५४ गाड्या आवक झाली असून १० गाड्या जुना बटाटा तर उर्वरित गाड्या नवीन बटाटा दाखल होत आहे. मागील आठवड्यात नवीन बटाटा ही जुन्या बटाट्याच्या बरोबरीने विक्री होत होता. परंतु आता नवीन बटाट्याचे दर उतरले असून प्रतिकिलो १२ रुपये पर्यंत उपलब्ध होत आहे. बाजारात जुन्या बटाट्याचा हंगाम येत्या १० ते १५ दिवसात संपणार असल्याने सध्या बाजारात जुना बटाट्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे जुन्या बटाट्याचे दर अधिक आहेत . जुना बटाटा हंगाम संपताच नवीन बटाटा साठवणुकीलाही सुरुवात होणार असून त्यामुळे या दरम्यान नवीन बटाट्याची आवक कमी होऊन दर पुन्हा वधारतील, असे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader