बाजारपेठेमध्ये ग्राहक नसल्याने उद्योगधंद्यात जरी मरगळ आली असली तरी विकासाच्या वाटेवर असणाऱ्या पनवेल परिसरात मात्र कोटींचे व्यवहार होत असल्याचे समोर येत आहे. सणासुदीच्या दिवसात गेल्या काही वर्षांपासून घर, वाहन आणि सोने खरेदीमध्ये ही कोटींची उड्डाणे मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळत आहेत. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या आणि येणाऱ्या घरांची खरेदी-विक्री जोरात होत असून ही आर्थिक उलाढाल अब्जो रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे. मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाच्या तिजोरीत मागील वर्षी ५११ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. घरे खरेदीप्रमाणे वाहन खरेदीला आणि चांगला प्रतिसाद मिळत असून यंदा पनवेलमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीमध्ये ३१५ कोटी रुपयांचा महसूल कराच्या रूपातून जमा झाला आहे. तर मागील वर्षीपेक्षा सोन्याचा भाव यंदा चार हजार रुपयांनी कमी झाल्याने पनवेलकरांनी दिवाळीत सोने खरेदीत गुंतवणूक करण्यात रस दाखविला आहे. यंदाच्या वर्षांत सोने खेरीदी-विक्रीत सुमारे तब्बल चारशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज पनवेलच्या सराफबाजारातील व्यापारांनी व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा