सध्या सर्वत्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यात कळंबोली मुख्यालय मैदानात नवी मुंबईतील पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे तर ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया ऐरोली पटनी कंपनी मैदानात मैदानी चाचणी आज पासून सुरु करण्यात आली. परीक्षार्थी असल्याने मोठ्या प्रमणात गर्द्दी होऊन वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कांदा बटाटा बाजाराची सिडको अभियंत्यांकडून पाहणी

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी

 रबाळे वाहतुक शाखेचे कार्यक्षेत्रातील पटणी मैदानात ३ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यत ठाणे ग्रामिण पोलीस भरती आहे. या भरतीचे वेळी पटणी ते कॅप जेमिनी कंपनी पर्यंत भरती करीता आलेल्या उमेदवारांची मोठया प्रमाणात वर्दळ असणार आहे. त्या करीता ग्रिन वर्ल्ड बिल्डींग गेट समोरील कट (पादचारी व वाहनांना विरुद्ध मार्गिकेवर जाणारा दुभाजकातील रस्ता)  ते कॅप जेमिनी प्रवेशद्वार क्रमांक  २ पर्यंत रस्ता व  दिवागाव सर्कल कडे जाणारी मार्गिका बंद ठेवावी लागणार आहे. तसेच कॅप जेमिनी कंपनी प्रवेशद्वार क्रमांक २ पासून ग्रिन वर्ल्ड बिल्डींग मेन गेट पर्यंत जाणाऱ्या मार्गिके दोन्ही बाजुची वाहतुक सुरू ठेवावी लागणार आहे.

हेही वाचा >>> उरण मध्ये ६४ वर्षीय महिलेची हत्या; आरोपी फरार,पोलीसांचा तपास सुरू

 त्यामुळे ३ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान सकाळी  ०५:०० पासुन रात्री एक वाजेपर्यंत ग्रिन वर्ल्ड इमारती समोरील  कट ते कॅप जेमिनी प्रवेशद्वार क्रमांक २ पर्यंत रोडची दिवागाव सर्कल कडे जाणारी लेन बंद करणे बाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. याला पर्यायी मार्ग  कँप जेमिनी कंपनी प्रवेशद्वार क्रमांक २ पासुन ग्रिन वल्ड बिल्डींग मेन गेट पर्यंत जाणाऱ्या मार्गीकेवरून दोन्ही लेनची वाहतुक सुरू राहील. त्या मार्गे सर्व वाहने इच्छीत स्थळी जातील. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.