संतोष जाधव,लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई</strong> – नवी मुंबई महापालिकेने शहरातील मलनिःसारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी समुद्रात सोडले जात होते. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रक्रिया केलेले वापरायोग्य पाणी समुद्रात सोडण्याची वेळ महापालिकेवर दोन हजार नऊपासून आली होती. वर्षाला करोडो रुपये खर्च करून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या एसटीपी केंद्राबाबत व प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडण्यात येत असल्याबद्दल पालिकेवर सातत्याने टीका केली जात होती. परंतु केंद्राच्या अमृत योजनेद्वारे पालिकेने टर्शिअरी ट्रीटमेंट केलेले पाणी बेलापूर व नेरुळ विभागातील उद्यानांना देण्यास मागील काही वर्षांपासून सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांना बसणार चाप, आरटीओ लवकरच सर्व खासगी कंपनी, महाविद्यालयात हेल्मेट सक्तीची नोटीस बजावणार

कोपरखैरणे व ऐरोली येथील टर्शिअरी  प्रकल्पातून  प्रक्रिया केलेले पाणी  १२ कंपन्यांनाही दिले जात आहे. त्यामुळे आता प्रक्रियायुक्त पाणी शौचालयांनाही देण्याची सुरुवात केली असून आता ज्या पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांजवळून प्रक्रियायुक्त पाण्याची लाईन गेलेली आहे अशा सर्वच शौचालयांना तसेच उद्याने, हरितपट्टे यांना प्रक्रियायुक्त पाणी देण्याचे पालिकेचे धोरण पर्यावरणदृष्ट्या स्वागतार्ह आहे.

महापालिकेच्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात व नियोजनबद्धरीत्या करणे शहरासाठी आवश्यक आहे. शहरातील बेलापूर विभागातील ३१ उद्यांनासाठी पिण्याचे पाणी देण्यापेक्षा प्रक्रिया केलेले पाणी देण्यात येत असून, ऐरोली व कोपरखैरणे टर्शिअरी प्रकल्पातून तयार होणारे पाणी काही कंपन्यांना दिले जात आहे. कोपरखैरणे प्रकल्पातील पाणी घणसोलीतील शौचालयाला देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून प्रक्रियायुक्त पाण्याची लाईन जात आहे त्याच्या नजीकच्या शहरातील  जास्तीत जास्त शौचालयांना  तसेच उद्याने व हरितपट्टे यांनाही हे पाणी देण्याचे नियोजन आहे.

– मनोज पाटील, सहशहर अभियंता

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recycle water of sewage treatment plants will use for toilets in navi mumbai city zws
Show comments