उरण : फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर या निसर्गप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धुळवडीनिमित्ताने जंगलात जाऊन तेथील वन्यजीव आणि प्राण्यांसाठी मृत झालेले पाणीसाठे पुन्हा जिवंत केले आहेत. त्यामुळे रखरखत्या उन्हाळ्यात या वन्यजीवांना प्यायला घोटभर पाणी मिळणार आहे. उरणमधील जंगल परिसरातील वन्यजीव अधिवासातील पाण्याच्या मृत पावलेल्या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य यामुळे झाले आहे.

चिरनेर बापदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून तिथे झऱ्यास पुनर्जीवित केले. या वेळी पाणवठ्यावर पाणी कमीच लागले. परिसरातील अनेक ठिकाणी पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या वर्षी वन्यजीव आणि जंगलातील प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष असेल. चिरनेर बापदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्याचा अनेक वर्षांपूर्वी तिथे असणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या वस्तीकडून पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत होता. पण आता त्या पाणवठ्याचे पाणी तेथील आदिवासी बांधव वापरत नसल्यामुळे हा पाणवठा गाळाने बुजला गेला होता.

vasai virar, dead animals
वसई विरार मध्ये मृत प्राण्यांच्या विल्हेवाटीसाठी दफनभूमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावास मंजुरी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
traffic stopped due to snake crossing road on khambatki ghat
सातारा : सरपटणाऱ्या जीवासाठी खंबाटकी घाट थांबला
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
forest lands latest news in marathi
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात
street light repair issues in Ambernath,
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा 
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

उरणमध्ये डोंगर उघडे-बोडके करून त्यांचे सपाटीकरण करून निसर्गाची जी अपरिमित हानी केली जातेय, त्याची झळ मानवाबरोबर वन्यजीवांनाही भोगावी लागतेय. उरणचा हवेचा दर्जा खालावत असल्याबाबत पर्यावरणवादी आवाज उठवत आहेत.

उरणमध्ये निसर्गाची हानी

  • मागील तीन वर्षे संस्थेने त्यातील गाळ काढून वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था केली.
  • अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा वावर व अस्तित्व अजूनही टिकून आहे व त्यात अनेक जीव असे आहेत ज्यांचे अस्तित्वच देशाच्या इतर भागांतून नष्ट होत चालले आहे.
  • उरणमध्ये विकासाच्या नावाखाली निसर्गाची जी भयानक कत्तल होतेय, वणवे लावून सर्व वनसंपदा नष्ट करीत आहेत.

Story img Loader