नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथे एका शौचालयजवळ एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तुर्भे येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेची वेळेपूर्वी घरीच प्रसूती झाली, महिलेने मुलीला जन्म दिला. मात्र ती मृत झालेली होती. तेव्हा या कुटुंबाने तिचा मृतदेह तुर्भेतील के के आर रस्त्यावर असलेल्या एका सार्वजनिक शौचालयाच्या मागील निर्जन जागेत टाकला. २५ तारखेला शौचालयात जाणाऱ्या काही जणांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी या बाबत पोलिसांना कळवताच पोलीसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला व अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा… सूर्यनारायणाच्या अस्तानंतरही पथदिवे बंदच; नवी मुंबईत नागरिकांकडून संताप व्यक्त

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी ही सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित व्यक्ती आढळून आले. तसेच या संशयित लोकांच्या घरातील एक महिला गरोदर असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींना शोधून काढले.यात मृत मुलीचे आई, वडील, आजोबा, आजीचा समावेश आहे.आरोपी ही अशिक्षित असून बिगारी काम करणारे आहेत. अशीही माहिती समोर आली. मृत मुलीची डी.एन.ए. तपासणी केली असून आरोपीत महिलेचीच मुलगी असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.

Story img Loader