लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण: मंगळवारी उरण ते खारकोपर रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या नावात बदल करून येथील महसुली गावांची नावे देण्याची मागणी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे.

उरण ते खारकोपर दरम्यानच्या १४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर एकूण पाच स्थानक आहेत. यामध्ये उरण, द्रोणागिरी, न्हावा शेवा, रांजणपाडा व गव्हाण अशी नावे रेल्वे व सिडको कडून देण्यात आली आहेत. या पाचही स्थानकांच्या नावात बदल करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी रेल्वे स्थानकात रेल्वे व सिडकोच्या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. यामध्ये उरण (कोट), द्रोणागिरी (बोकडवीरा), न्हावा-शेवा (नवघर) रांजणपाडा (धुतूम) आणि गव्हाण (जासई) अशी नावे बदलण्याची मागणी आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात, घाऊक बाजारात प्रतिडझन २००-५०० रुपयांवर

नेरुळ- उरण रेल्वे मार्गावरील उरण ते खारकोपर या दरम्यान लवकरच लोकल धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसूली त्याचप्रमाणे येथील ऐतिहासिक व पारंपारिक संबोधन करण्यात येणाऱ्या गावांनुसार ओळख कायम राहावी, अशी नावे रेल्वे स्थानकांना देण्यात यावीत अशी मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, बोकडवीरा ग्रामसुधार मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच रवी वाजेकर, धुतूम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद ठाकूर आदीजण उपस्थित होते.