उरण येथील बोरी गावातील कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी सहा महिन्यांचे मांजराचे पिल्लू ५० फूट उंच माडाच्या झाडावर चढले ते चार दिवस अडकून पडले. यामुळे, मांजराच्या या पिल्लाला झाडावरून खाली काढण्यासाठी अग्निशमन दल, प्राणीमित्रांना पाचारण करण्यात आले होते. आणि सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर मांजराचे पिल्लू खाली उतरवण्यात यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : रस्त्यावरील वाहनांच्या प्रकाशानंतर होतोय पथदिव्यांचा झगमगाट….

चार दिवस झाडावर अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची सुटका

उरण शहरातील बोरी गावातील घराच्या आवारात बागडणाऱ्या मांजराचे पिल्लू चार दिवसांपासून ओरडत होते. यामुळे, ते घराच्या बंद खोलीत अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, रविवारी दुपारी बंद घरात पाहणी केली असता ते पिल्लू हे घराजवळच्या माडाच्या झाडावर मांजराचे एक पिल्लू अडकल्याने स्थानिक रहिवाशांना निदर्शनास आले. तर, सुमारे ५० फूट उंच माडाच्या झाडावर चढणे शक्य नसल्याने या पिल्लाला वाचविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याचे स्थानिक रहिवासी वाहिदउल्ला खान यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- बेलापूर येथे ‘इंडियन स्वच्छता लीग’चे आयोजन’; शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुणांचा सहभाग

प्राणीमित्रांकडून पिल्लाची सुखरुप सुटका

अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मांजराचे पिल्लू अडकलेल्या झाडापर्यंत गाडी पोहचणे शक्य नसल्याने ते माघारी निघून गेले. तर, याच दरम्यान स्थानिक प्राणीमित्रांना या घटनेची माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी हजर झाले.
त्यानंतर, माडाच्या या झाडावर चढून या पिल्लाची सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळेस, चार दिवस अडकलेल्या या मांजराच्या पिल्लाने बाजूच्या झाडावर उडी मारल्याने पुन्हा त्याच्या सुटकेचा प्रयत्न करण्यात आला. मांजराचे पिल्लू झाडाच्या फांद्यांवरून सुखरूप खाली उतरल्याने रहिवाशांनी एका मुक्या जीवाचे प्राण वाचविण्यात यश आले असल्याचे उरण मधील प्राणीमित्र राजेश नागवेकर यांनी सांगितले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rescue of a kitten stuck on a 50 foot tall tree in uran dpj