पनवेल: तालुक्यातील करंजाडे, कामोठे आणि कळंबोली या सिडको वसाहतींमध्ये पावसाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत. २४ तास पाणी पुरवठा आणि शहरांचे शिल्पकार हे सिडको महामंडळाचे आश्वासन या परिस्थितीमुळे खोटे ठरत आहे.

वसाहती वसविल्या मात्र त्या वसाहतींमधील रहिवाशांना पाणी पुरवठ्याचे नियोजन सिडको मंडळ गेल्या २० वर्षात करु शकली नाही. सिडको मंडळाचा कारभार आतापर्यंत अनेक उच्चपदस्थ सनदी अधिका-यांनी केला मात्र पाण्याबाबत संपन्नता सिडको मंडळाला मिळवता आली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवी मुंबई महापालिका यांच्याकडून पाणी घेऊन ते रहिवाशांपर्यंत पोहचविणे एवढेच सिडको मंडळाचे काम राहीले आहे. शहरांसोबत वेळीच जलाशय उभारली असती तर ही वेळ आली नसते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

हेही वाचा… जेएनपीए बंदरात सडतोय कांदा; २०० कंटेनर मधील ४ हजार टन सडू लागला

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) १२ तासांचे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने १८ ऑगस्टपासून पाणी पुरवठा बंद केला. १२ तासांचे दुरुस्तीचे काम ३० तास लांबणीवर गेल्याने कळंबोलीकरांचे हाल झाले. कळंबोली वसाहतीला ३० दश लक्ष लीटर पाण्याची गरज होती. मात्र पाच दिवसानंतरही कमी दाबाने पाणी पुरवठा ३० दश लक्ष लीटर पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यातही अनेक गृहनिर्माण संस्थांना टॅंकरचे पाणी प्यावे लागले. मागील पाच दिवसात दररोज १० टॅंकरने गृहनिर्माण संस्थांच्या मागणीनंतर प्रती टॅंकर ११० रुपयांनी टॅंकर सोसायट्यांना पुरवठा गेल्याची माहिती सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. तसेच कामोठे वसाहतींमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. येथील साडेनऊशेहून अधिक लहान मोठ्या गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशी पावसाळ्यात गेल्या दिड महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना करत आहेत.

हेही वाचा… उरण एज्युकेशन विद्यालय संस्थेच्या ओळखपत्र शुल्काला भाजपचाही विरोध

कामोठे वसाहतीला नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून पाणी उसने घेऊन सिडको मंडळ पाणी पुरवठा करते. दिवसाला ३८ दश लक्ष लीटर पाण्याची आवश्यकता असताना कामोठेवासियांना ३२ ते ३३ दश लीटर पाणी नवी मुंबई महापालिका पुरवठा करते. हा पाणी पुरवठा वाढविण्यासाठी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांची भेट घेतली. मात्र नवी मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची गरज असल्याने राज्याचे नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी पनवेल पालिका, नवी मुंबई महापालिका आणि सिडको, एमजेपी अशा प्राधिकऱणांचे उच्च पदस्थांची बैठक घेऊन पनवेलचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी आ. ठाकूर यांनी केली आहे. परंतु मंत्री व सरकारी अधिका-यांची ही बैठक कधी लागेल ते अद्याप ठरलेले नाही.

हेही वाचा… नवी मुंबई परिवहन विभागाचे नियोजन कसे? चालते ? वाशीत ‘लोकसत्ता शहरभान’चे आयोजन

करंजाडे वसाहतीमधील रहिवाशी पाणी प्रश्नामुळे अक्षरश: वैतागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सिडको मंडळाचे अधिकारी झोनींग पद्धतीने पाणी पुरवठा करु असे आश्वासन देऊन मोर्चा आंदोलने करु नका असा सल्ला नागरिकांना देत आहेत. मात्र दोन महिने उलटले तरी दिवसाला प्रत्येक सोसायटीला टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही पाणीबाणी असेल तर हिवाळा व उन्हाळ्यात काय या भितीने झपाट्याने वाढणा-या सिडको वसाहतींमधील बांधकाम व्यवसायावर पाणीबाणीची झळ पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याबाबत सिडकोचे अधीक्षक अभियंता प्रणिक मूळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यांनीच करंजाडे वसाहतीमधील नागरिकांना मोर्चा काढण्यापूर्वी सिडकोचे पाणी पुरवठा विभाग झोनिंग पद्धत राबवून पाणी पुरवठा सूरळीत करु असे आश्वासन दिले होते.

आम्ही अक्षरश: करंजाडे सदनिका खरेदी करुन फसलो. सिडको मंडळाचे या वसाहतीकडे संपुर्ण दुर्लक्ष झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून घराबाहेर पाणी आणि घरातील नळ कोरडे अशी स्थिती आहे. २४ तास पाणी हे दिवास्वप्नच राहीले. सिडको अधिका-यांना विनवणी करुनही यावर कायमचा तोडगा काढत नाही. वसाहतीमधील बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र देताना पिण्याच्या पाण्याची तरतूद असेल तरच नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र दिले पाहीजे. ही सामाजिक फसवणूक सूरु आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव साजरा करताना सुनियोजित शहरात पाण्याची बोंबाबोंब आहे. -चंद्रकांत गुजर, अध्यक्ष, करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स असोसिएशन