नवी मुंबई : महाराष्ट राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर असून या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. नवी मुंबईचा ८९.५७  टक्के निकाल लागला असून ९१.४९ टक्के मुलीं पास झाल्या असून नवी मुंबई शहरात ही मुलींनी बाजी मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 यंदा राज्याचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता बारावीत ९३.७३. टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९८.१४ मुले उत्तीर्ण झाले आहेत.  निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्या प्रमाणे नवी मुंबईतही मुलींनी बाजी मारली आहे. नवी मुंबई शहरातून ६३ महाविद्यालय, शाळांमधील  विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. एकूण १५ हजार ८२३परीक्षार्थींची नोंद झाली होती. त्यापैकी ८ हजार ४२४  मुले तर ७ हजार ३०३ मुली अशा एकूण १५हजार ७२७  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी  ७ हजार ४०५  मुले  आणि ६ हजार ६८२ मुली असे १४ हजार ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.नवी मुंबई शहराचा एकूण निकाल ८९.५७ टक्के लागला असून यात  ९१.४९ मुली पास झाल्या आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालात  राज्या प्रमाणे  नवी मुंबई शहरात ही मुलींनीच बाजी मारली आहे.

करोना नंतर प्रथमच शंभर टक्के क्षेमतेसह संपुर्ण अभ्यासक्रमांवर सेंटर नुसार बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. तेच मागील वर्षी ७५% होत्या. करोना कालावधीत मुलांमध्ये लिहिण्याची क्षमता कमी झाली असून यंदाच्या परीक्षेचा मुलांवर ताण पडला. यंदा मुंबईचा निकाल दोन टक्केनी कमी लागला आहे . यंदा निकालाची टक्केवारी कोरोनाच्या खंडित कालावधीनंतर थेट परिक्षा झाल्याने घसरली आहे.शिक्षण मंडळाच्या वतीने कॉपी मुक्त अभियान देखील राबविण्यात आले होते.

-नितीन उपासनी, विभागीय अध्यक्ष,  मुंबई मंडळ