शिक्षक व पालकांमध्ये गोंधळाची स्थिती
नवी मुंबई -दरवर्षी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्राथमिक ते दहावीपर्यंतचा निकाल १ मे महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात येतो. परंतु यावर्षी महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय संचालक कृष्णकुमार पाटील यांनी २८ एप्रिल रोजी काढलेल्या पत्रकाप्रमाणे राज्यभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा निकाल १ मे या महाराष्ट्र दिना ऐवजी ६ मे रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त देण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई : योग विवेकबुद्धीला जागृत करतो, योग विद्या निकेतनचे उपाध्यक्ष दुर्गादास सावंत यांचे प्रतिपादन
त्यामुळे पालिका क्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल १ मे ऐवजी ६ मे रोजी मिळणार आहे. त्यादिवशी राजश्री शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा करून शाळांचा निकाल जाहीर केला जाणार आहे व विद्यार्थ्यांना व पालकांना त्याच दिवशी गुणपत्रकाचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. १ मे रोजी शाळांना सुट्टी लागल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ६ मे रोजी शाळेत यायचे का याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पालिका क्षेत्रातील बहुतांश खाजगी शाळांचे निकाल १ मे पूर्वीच जाहीर करून मुलांना वाटप करण्यात आल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कच्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख, आता ३ मे चा मुहूर्त?
महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी २८ एप्रिल रोजी काढलेल्या पत्रकाबाबतची माहिती महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना व शिक्षकांना देण्यात आली आहे .त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचा निकाल हा १ मे ऐवजी ६ मे रोजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अरुणा यादव, शिक्षणाधिकारी नवी मुंबई महापालिका