पनवेल : मावळ लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाने पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. चार महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने पनवेल विधानसभेतील निवडणूकीत भाजपची मते कमी झाली का असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
पनवेल विधानसभेच्या येऊ घातलेल्या चार महिन्यांवरील निवडणूकांना आ. प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा सामोरे जाणार आहेत. मात्र २०१९ सालच्या विधानसभा निवडणूकीत आ. ठाकूर यांना पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. मावळ लोकसभेच्या मंगळवारच्या निकालपत्रात महायुतीचे श्रीरंग बारणे यांना १,५०,९२४ मते मिळाली. ही मते पडण्यासाठी आ. प्रशांत ठाकूर यांनीही विधानसभा निवडणूकीच्या रंगीत तालिमीप्रमाणे रस्त्यावर उतरुन प्रचार केला. विधासभा क्षेत्रातील बुथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा खारघर येथे घेण्यात आली. त्यानंतरही महायुतीच्या उमेदवार बारणे यांना मिळालेली मते कमी असल्याने ही मते कमी होण्याची कारणे काय असा प्रश्न भाजपच्या चाणक्यांना पडला आहे. महायुतीच्या उमेदवार बारणे यांना यावेळी कमी मते मिळाली त्याही पेक्षा या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना १,१९,८८६ मते मिळाली. ही बाब भाजपच्या चाणक्यांना चिंतेत टाकणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा