हैदराबादमधील ऑटो अभियंत्याची विश्वमोहिम
हैद्राबादमधील ३३ वर्षीय तरुण नवीन रॅबेली या ऑटो अभियंत्याने तयार केलेल्या ‘तेजस’ या त्याच्या सौरउर्जेवर चालणाऱ्या रिक्षातून जगाला प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा व वाहनांचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तो भारतातून समुद्रमार्गे इराण प्रवास करण्यासाठी कोचीवरून उरणच्या जेएनपीटी बंदरात आलेला आहे. त्याची रिक्षा जेएनपीटी बंदरातून इराणमध्ये नेण्यात येणार असून तेथून तो आपल्या पुढील जगभ्रमंतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. या वेळी युरोपीय देशात जाणार आहे. तसेच तेथील विद्यापीठांत विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहे.
देशातील वाहनांमुळे वाढते वायुप्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे हानीकारक कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रामाण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे यासाठी नवीने हैद्राबादमधील आपली महिद्रा कंपनीतील मोठय़ा रकमेची नोकरी सोडून संदेश देण्यासाठी हैद्राबाद मधील हा तरुण अभियंता त्याने स्वत:च तयार केलेल्या ग्रीनऊर्जेवर चालणाऱ्या तीन चाकी रिक्षा(टक टक) ने जग भ्रमंतीसाठी निघालेला आहे.त्याने कोची ते उरण असा २६०० किलोमीटरचे अंतर या रिक्षाने पार केले आहे.त्यानंतर तो उरणमध्ये आला आहे. त्याची रिक्षा जेएनपीटी बंदरातून इराण येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा इराण ते युरोप असा प्रवास सुरू होणार आहे. सध्या खासकरून दिल्ली आणि मुंबईतील वाहनामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचा फटका बसत असल्याने स्वच्छ ऊर्जेचा वापर वाहनांमध्ये करावा.असा आपला आग्रह असून त्याचा संदेश देण्यासाठीच आपण हा प्रवास करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्याला रस्त्याच्या मार्गानेच इराणला जायचे होते.मात्र सध्या पाकिस्तानमधील स्थिती पाहता व्हिजा मिळण्यात अपयश आल्याने समुद्रमार्गे जात असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले. मूळच्या तेलंगना राज्यातील असलेल्या नवीनला आपण काय तरी करावे असे वाटत असल्याने त्याने यापूर्वी बँगलोर,दिल्ली,नोएडा येथे जाऊन येथील विद्यार्थ्यांशी स्वच्छ ऊर्जेसाठी संवाद साधला आहे.तो इराणमध्ये १० मार्च पर्यंत पोहचणार असून जुलै महिन्यात त्याचा हा प्रवास लंडनमध्ये संपणार आहे.

Story img Loader