नवी मुंबई: एका रिक्षा चालकाला उसाचा रस पिणे महागात पडले आहे. आपली रिक्षा पार्क करून उसाचा रस या रिक्षा चालकाने प्यायला आणि पुन्हा रिक्षा कडे आले असता रिक्षा अनोळखी व्यक्तीने चोरी केल्याचे समोर आले. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेश कुमार यादव असे यातील फिर्यादीचे नाव असून रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. २९ तारखेला त्यांनी सकाळी आठच्या सुमारास नेहमी प्रमाणे रिक्षा बाहेर काढून दिवसभर प्रवासी ने-आण केले. संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी त्यांनी कोपरी गावात एका ठिकाणी रिक्षा थांबवली आणि उसाचा रस पिण्यास गेले. रिक्षा नजरेच्या टप्प्यात असल्याने त्यांनी किल्ली रिक्षालाच ठेवली. मात्र म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी अगदी तसाच अनुभव रमेश यादव यांना आला.

आणखी वाचा- नवी मुंबई : योग विवेकबुद्धीला जागृत करतो, योग विद्या निकेतनचे उपाध्यक्ष दुर्गादास सावंत यांचे प्रतिपादन

उसाचे गुऱ्हाळ शेजारीच असल्याने त्यांनी रिक्षाची किल्ली तशीच ठेवली. मात्र उसाचा रस पिताना कदाचित त्यांची नजर इकडे तिकडे गेली असावी आणि नेमके याच वेळेची संधी साधून अनोळखी व्यक्तीने रिक्षा सुरु करून रिक्षासह निघून गेला. जेव्हा रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी रमेश यादव हे रिक्षा पार्किंग साठी निघाले त्यावेळी रिक्षाच त्यांना सापडली नाही. त्यांनी बराच वेळ आसपास रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षाच आढळून न आल्याने रिक्षा चोरी झाल्याची त्यांची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी रिक्षा चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw stolen in 10 minutes in navi mumbai mrj