राज्यात एक ऑक्टोबरपासून रिक्षाचे किमान भाडे हे दोन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. रिक्षा प्रवासात पहिल्या टप्प्यासाठी २१ एवजी २३ रुपये मोजावे लागणार आहेत.त्यानुसार आता मीटरमध्येही आवश्यक बदल करावा लागणार आहे, मीटर प्रमाणीकरण – कॅलिब्रेशन करावे लागणार आहे. यासाठी नवी मुंबई इथल्या वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे – आरटीओकडे रिक्षांच्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई पोलीस दलात खांदेपालट होण्याची शक्यता
नवी मुंबईमध्ये सुमारे ३६ हजार नोंदणीकृत रिक्षा असून मीटर प्रमाणे चार आसनी, तीन आसनी सीट प्रमाणे रिक्षा चालवल्या जातात. १२ ऑक्टोबरपासून कॅलिब्रेशनच्या कामाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत तीन दिवसात फक्त ७५ रिक्षांनी मीटर प्रमाणीकरण केल्याची माहीती आहे. काही रिक्षा चालक नवीन दरानुसार भाडे आकारणी करत आहेत तर अद्याप मीटरमध्ये बदल केला नसल्याने काही रिक्षा चालक जुनेच भाडे घेत आहेत.मात्र यामुळे काही ठिकाणी रिक्षा चालक आणि प्रवाश्यांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
महिनाभरात सर्व रिक्षांच्या मीटरमध्ये बदल केले जातील अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे. कॅलिब्रेशनसाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी ही काम सुरू राहणार आहे.