पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पालिका प्रशासनाने सिडको वसाहतींमध्ये रस्त्यांचे बांधकामाला सुरुवात करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २७ किलोमीटर रस्ते बांधकामाविषयी प्रशासकीय ठराव मंजूर झाल्यानंतर दसºयाच्या मुहूर्तावर या ठरावाप्रमाणे पनवेल पालिकेने २३७ कोटी रुपये खर्च करुन विविध प्रभागांमध्ये रस्ते बांधकामासंदर्भात मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. यामुळे यंदाच्या दस-यानंतर काही दिवसांत खड्डेमुक्त रस्त्यांचे सामान्य पनवेलकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी चिन्हे दिसत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नवी मुंबईत मंगळवारी ठराविक काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी

सिडको वसाहतींमध्ये रस्ते व इतर सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यावर पालिकेने पहिल्यांदाच कोट्यवधी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. २७ किलोमीटर रस्त्यांसाठी पालिका २३७ कोटी रुपये खर्च करणार आहे. यामध्ये १६ किलोमीटरचा मार्ग डांबरी आणि ११ किलोमीटरचा मार्ग कॉंक्रीटचा असेल, अशी माहिती पालिका आय़ुक्त गणेश देशमुख यांनी दिली. शनिवारी पालिका आयुक्त देशमुख यांनी अधिका-यांसह खारघर, कामोठे व कळंबोली येथील रस्त्यांची पाहणी केली. या दौ-यात प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्तांनी दोनच दिवसात संबंधित रस्त्यांची बांधकामासाठीची निविदा पालिका जाहीर करणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा >>>उरणकरांना सुवार्ता, शहरातील कोंडीवरील उतारा असलेल्या बाह्यवळण मार्गाचे काम वेगात; २०२४ मध्ये काम पूर्ण होणार

कामाचे नाव

– खारघर बेलपाडा येथील अंडरपास ते एनआयएफटी महाविद्याालयापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व इतर कामे करण्यासाठी ९ कोटी रुपये

–  बेलपाडा मेट्रो स्टेशन ते गणेश मंदिर सेक्टर- ५ ते उत्सव चौक रस्त्याचे व्हाईट टाेपॅग पध्दतीने काँक्रीटीकरण करणे, व पादचारी मार्गाचे उन्नतीकरण व इतर कामे करण्यासाठी १३ कोटी ८१ लाख

–  खारघर मधील लिटील वल्र्ड मॉल सेक्टर – २ ते उत्सव चौक रस्ता काँक्रिटीकरण करणे व रस्ते डांबरीकरण करून उन्नतीकरण व इतर कामांसाठी ८४ कोटी ४० लाख रुपये

– कळंबोली येथील शीव-पनवेल महामार्गालगत सेक्टर- १ ते तळोर्जा ंलक रोड सेक्टर- १० ई पर्यंतचा मुख्य रस्ता काँक्रीटीकरण व इतर कामांसाठी ६५ कोटी २ लाख रुपये

–  कळंबोली येथील शीव पनवेल महामार्ग ते के. एल. ई कॉलेज सेक्टर- १ ते रोडपाली येथील सेक्टर-१२ तलावपर्यंत रस्त्याचे उन्नतीकरण व इतर कामांसाठी १५ कोटी ८८ लाख

– पनवेल महानगरपालिकेचे प्रस्तावित मुख्यालय इमारत ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बपर्यंतच्या रस्ता उन्नतीकरण, काँक्रिटीकरण व इतर कामांसाठी ३६ लाख ७७ हजार रुपये

– पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गावरील (न्यायाधीश निवास) ते ठाणा नाका रोडवरील मित्रानंद सोसायटीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण व इतर कामांसाठी ६ कोटी ९२ लाख रुपये

–  नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर- १ एस येथील एच.डी.एफ.सी. बँक समोरील चौक व सेक्टर- ११ येथील क्रिकेट अ‍ॅकॅडमी समोरील चौक काँक्रीटीकरणासाठी ५ कोटी २७ लाख रुपये

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road construction in panvel municipal area after dasara amy
Show comments