नवी मुंबई वाहतूक शाखेतर्फे रस्ते सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. सप्ताहाचा शुभारंभ प्रसंगी पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, व्हॉईसओवर आर्टीस्ट श्रीमती मेघना एरंडे यांचे उपस्थितीत होणार आहे.
हेह वाचा- नवीन लसणाने जुन्याचे दर वधारले; एपीएमसीत प्रतिकिलो ८० ते ११० रुपयांवर
देशात दरवर्षी दीड लाख लोकांचा जीव अपघातात जातो. नवी मुंबईतही दरवर्षी किमान २५० लोकांचा जीव जातो तर १५० पेक्षा अधिक लोक कायम जायबंदी होतात. त्यामुळे दरवर्षी जानेवारी मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. करोना काळानंतर २०२२ मध्ये संसर्गजन्य नियमपालन करीत हा सुरक्षा सप्ताह पार पडला मात्र यंदा जोशात होणार असल्याचे सुतोवाच वाहतूक शाखेकडून केले गेले आहे. या सप्ताहाचे उद्धाटन सिडको एक्झीबीशन सेंटर, वाशी येथे सकाळी साडेदहा वाजता पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे यांच्या हस्ते केला जाणार असून प्रमुख उपस्थिती व्हॉईसओवर आर्टीस्ट मेघना एरंडे यांची असणार आहे. तर सप्ताहाचा समारोप १७ जानेवारीला करण्यात येणार आहे. संपुर्ण सप्ताह मध्ये नागरिकांमध्ये वाहतुक सुरक्षे विषयक व्यापक जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीने दररोज वाहतुक नियमांच्या वेगवेगळया विषयांवर वेगवेगळे उपक्रम नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे विविध चौकात राबविण्यात येणार आहेत. यात हेल्मेट डे, सीट बेल्ट डे, नो सिग्नल जंम्पींग डे, नो हॉकींग डे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर न करणे, वन डे विथ ट्रॅफिक पोलीस, जड अवजड वाहने डावे बाजूने चालविणे (किप लेप्ट), नो फॅन्सी नंबर प्लेट, नो टिटेंड ग्लास इ. विषयांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे महत्वाचे चौकांत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई : प्लास्टिक विरोधी जनजागृतीत आता तृतीयपंथीयांचीही मदत; अनोखा उपक्रम
सदर उपक्रमांमध्ये प्रामुख्याने पोलीस वाहन चालकांना नियम समजावून सांगून प्रबोधन करण्यावर भर देणार आहेत. तसेच छोटा पोलीस हा अभिनव उपक्रम देखील वाहतुक पोलीसांकडुन राबविण्यात येणार आहे.. हे सर्व उपक्रम प्रभावशाली करण्यासाठी छोटा पोलीस, यमराज, दारुची बाटली, इत्यादींचे मॅस्कॉटचा उपयोग करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे फ्लॅश मॉब व पथनाटय यांचे सादरीकरण महत्वाचे ठिकाणी करण्यात येणार आहे. नागरिकांना वाहतुक सुरक्षेविषयी साक्षर करण्यासाठी चौका-चौकात बॅनर लावून तसेच वाहनांवर वाहतुक सुरक्षेविषयी संदेश देणारे स्टिकर्स चिकटविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना माहितीपत्रके देखील वाटप करण्यात येणार आहेत. वाहतुक सुरक्षेचे अनुषंगाने नागरिकांना मोफत हेल्मेट वाटप, पीयुसी चेकींग कॅम्प, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे असा भरगच्च साप्ताह असणार आहे. या शिवाय वाहनचालक व वाहतुक पोलीस यांचेसाठी डोळे तपासणीचा कॅम्प घेण्यात येणार असून आयुक्तालय स्तरावर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.
हेही वाचा- शीव पनवेल मार्गावरील एमएसआरडीसीचे ४ उड्डाणपुल नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत
तिरुपती काकडे (पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग) शून्य अपघात हे आमचे उद्दिष्ट आहे. अपघातातील गांभीर्य समजून सांगण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. तसेच या साप्ताहनिमित्त जास्तीत जास्त वाहनचालाकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे सर्वांना आवाहन आम्ही करीत आहोत.