लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : जेएनपीटी बंदर,द्रोणागिरी आणि उरण मधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या कंटेनरच्या धडकेत मागील वर्षी ९ महिन्यात २५ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. रस्त्यावरील या यमदूत रुपी कंटेनरना आणखी किती बळी हवेत असा सवाल आता येथील वाहन चालक व जनतेकडून केला जात आहे. कारण यातील बहुतांशी अपघात हे रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या बेकायदा कंटेनर वाहनांमुळे झाले आहेत. किंवा भरधाव कंटेनर वाहनाने धडक दिल्याने झाली आहेत.

जेएनपीटी बंदरातील मालाची ने आण करणारी दहा हजारांहून अधिक कंटेनर वाहने दररोज उरण मधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करीत आहेत. या कंटेनर वाहनांच्या बेदरकारीमुळे ३३ वर्षात शेकडो दुचाकीस्वाराना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सुरुवातीला अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे तर सध्या रस्ता रुंदीकरणा नंतर जेएनपीटी बंदर ते नवी मुंबई व पळस्पे या दोन्ही मार्गावर बेकायदा उभी करण्यात आलेल्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई : दिवाळीतील वाहतूक कोंडीवर उपायांचे प्रयत्न

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या जेएनपीटी ते किल्ला (नवी मुंबई) व जेएनपीटी ते पळस्पे या दोन्ही राष्ट्रीय मार्गावर उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आंदोलनामुळे प्रवासी वाहतूक व गावांना जोडणाऱ्या सेवा(सर्व्हिस) मार्गाची उरणारणी करण्यात आली आहे.मात्र ही सेवा मार्गच कंटेनर वाहनामुळे वाहनतळ झाली आहेत. त्यामुळे प्रवासी व दुचाकी वाहने मुख्य मार्गाचा वापर करीत आहेत. याचा फटका या वाहनांना बसून अपघातात वाढ झाली आहे. या कंटनेर रुपी यमदूतानी आता पर्यंत उरण मधील सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ही बळी घेतले आहेत. त्यामुळे या यमदूताना आणखी किती बळी हवेत असा प्रश्न केला जात आहे.

उरण मधील दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील सेवा( सर्व्हिस)मार्ग सुरू करण्याची मागणी उरण मधील नागरिकांच्या वतीने वारंवार करून ही ती सुरू केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads between jnpt and dronagiri become depots for container vehicles mrj
Show comments