शेखर हंप्रस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

नवी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईहून मराठवाडय़ात जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेसच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे खासगी बसेसना मोठी मागणी आली आहे. मात्र खासगी वाहतूकदार दुप्पट, तिप्पट भाडे आकारत आहेत.

धाराशीव येथे जाण्यासाठी शनिवारी, रविवारी प्रतिप्रवाशी १५०० ते १८०० भाडे आकारले जात होते. सोमवारी तेथील तणाव कमी झाला. त्यामुळे हे दर एक हजार रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र जालना, संभाजी नगर येथून मुंबईच्या दिशेने ये-जा करण्याचे प्रवासी दर वाढलेले होते, अशी माहिती वाशी येथील एका खासगी बस वाहतूकदाराने दिली.

हेही वाचा >>>नवी मुंबई : सात लाखांच्या विमा पॉलिसीसाठी तब्बल २ कोटी २४ लाखांची ऑनलाईन फसवणूक, आरोपीला अटक

आम्ही अशा वाहनावर कारवाई करीत असतो. मात्र तरीही असा प्रकार सुरू असेल तर कृपया उपप्रादेशिक कार्यालयास संपर्क करावा. यासाठी ९१८८५०७८३६४३ या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, तात्काळ कारवाई केली जाईल.

हेमांगी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांत एसटीच्या २५० आगारांपैकी ४६ बंद आहेत. प्रामुख्याने अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर , परभणी, हिंगोली, जालना, नांदेड व धाराशीव या जिल्ह्यांमध्ये बंदचा प्रभाव अधिक आहे. एसटीचे सुमारे ५ कोटी २५ लाखांचे नुकसान झाले आहे. सोमवारी एसटीच्या एकूण बस फेऱ्यांपैकी सुमारे ६२०० फेऱ्या बंदमुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सोमवारी सुमारे २ कोटी ६० लाख रुपये महसूल बुडाला आहे. –अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी राज्य परिवहन महामंडळ