उरण शहरातील हरी पांडव पथ येथून जाणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी व हातातील बांगडय़ा चोरटय़ांना लुटल्या. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुरेखा लक्ष्मण पारधी ही घरकाम करणारी महिला घरी जात असताना दोन चोरटय़ांनी ही चोरी केली. या दोघांनी कोणता तरी फवारा मारल्याने ते चोरी करीत असताना आपल्याला काहीच समजले नाही, अशी माहिती या महिलेने पोलिसांना दिली. मात्र सकाळी साडेदहा वाजता वर्दळीच्या रस्त्यात ही घटना भररस्त्यात घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करून चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार झाले.
उरणमध्ये भरदिवसा महिलेचे दागिने लुटले
घरकाम करणारी महिला घरी जात असताना दोन चोरटय़ांनी ही चोरी केली.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 01-12-2015 at 08:19 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in uran