नवी मुंबई: खासगी बसेस मधून होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओकडून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. मे आणि जून महिन्यात तब्बल ७४ अवैध वाहतूक करणाऱ्या बसवर कारवाई करण्यात आली असून ४ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

आजही शहरातील महामार्गवर काही वाहने विना परवाना, फिटनेस, इन्शुरन्स व पीयूसी नसताना नियमबाह्यपणे चालविली जात आहेत. अनेकदा खासगी बस मधून प्रवासी वाहतुकीबरोबर व्यासायिक मालवाहतुक ही केली जाते. खासगी बसेस या प्रवासी वाहतुकीसाठी असून मालवाहतुकीसाठी त्याचा वापर करणे नियमात नसताना ही अनधिकृत रित्या मालवाहतूक केली जाते.

हेही वाचा… घाऊक बाजारात टोमॅटो शंभरी गाठणार? सोमवारी एपीएमसीत प्रतिकिलो दरात २० रुपयांनी वाढ

जादा प्रवासी वाहतूक करणे इत्यादी अवैध पध्दतीने वाहतूक केली जात आहे. अशा बसवर आरटीओ कडून मे आणि जून या दोन महिन्यांत ७४ बसवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ४९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आली आहे ,अशी माहिती आरटीओ उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.