नवी मुंबई: गणेशोत्सवाच्या तोंडावर नवी मुंबई आरटीओ कडून शीव- पनवेल महामार्गावर जादा भाडे आकारणी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार असून प्रवाशांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनाने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवादरम्यान कोकणासह इतर जिल्ह्यात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. कोकणात जाण्यासाठी शासनाकडून तसेच रेल्वे सुविधा ही असते,परंतु ऐन वेळी ही सुविधा मिळत नसल्याने काही कारणास्तव प्रवासीवर्ग खासगी बसचा पर्याय निवडतात. मात्र ऐन वेळी प्रवासी वाढल्याने खासगी बस चालक संधीचा फायदा घेत नेहमीपेक्षा अव्वाच्यासव्वा दराने जादा भाडे आकारणी करतात. प्रवाशांनाही नाईलाजास्तव ज्यादा तिकीट दराने प्रवास करावा लागतो. मात्र याचा आर्थिक भुर्दंडही प्रवाशांना सोसावा लागतो. खासगी बस चालकांकडून जादा भाडे आकारणी करून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते.

हेही वाचा… उपोषणकर्त्यांना भेटण्यास गेलेल्या शासन प्रतिनिधी, आमदारांना करावा लागला निषेधाचा सामना

मात्र या गणेशोत्सव दरम्यान शीव-पनवेल महामार्गावर प्रवाशांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. तसेच प्रवाशांना खासगी बस चालक जादा भाडे आकारणी करून वेठीस धरत असेल तर प्रवाशांनी ८८५०७८३६४३ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर तक्रार करावी असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवा दरम्यान गर्दीचा फायदा घेत खासगी बस चालकांकडून जादा भाडे आकारणी केली जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सवा दरम्यान शहरातील महामार्गवर आरटीओचे पथक तैनात असणार आहेत. तसेच प्रवाशांनी देखील खासगी बस जादा भाडे आकारणी करून वेठीस धरत असेल तर ८८५०७८३६४३ या व्हाट्सअप नंबरवर तक्रार करावी. – हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto keeps a close eye on those who charge excessive fares during ganeshotsav dvr